Posts

Ahupe Camp 2023

Image
 अहुप्याला जायच्या  उत्सुकतेमुळे झोप येत नव्हती. अखेर कॅम्पचा दिवस उजाडला. सकाळी ५ मे २०२३ ला बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर आमचा काफिला घोडेगाव मार्गाने पुढे निघाला. डिंबे धरणामुळे धरण क्षेत्राच्या खालच्या भागात बर्‍याच गावांचा विकास झालेला दिसला. परिणामी ह्या भागातील गावांच गावपण हरवल्यासारखं वाटलं. अजूनही वातावरणात उकाडा होता. डिंबे धरणाला कम्प्लिट एक वेढा घातला, चारी बाजुंनी धरणाच्या पाण्यात सह्याद्रीच्या डोंगरांच नितळ आरशासारखं प्रतिबिंब पाहिलं.   पेसा , दिगद गावे जशी लागली तसा वातावरणात एक गारवा जाणवू लागला. मातीचा रंग लालेलाल झाला आणि आम्ही अहुप्यात येऊन पोहोचलो.  अहुपे हे भीमाशंकर जवळचं घाटमाथ्यावरचं शेवटचं गाव!  भीमाशंकरप्रमाणेच हे गाव सदाहरित जंगलांच्या प्रकारात मोडते. ट्रान्स-सह्याद्रीचे प्रसाद पोतदार सर कॅम्पसाठी सह्याद्री पिंजून विलक्षण सुंदर जागा शोधून काढतात.    अहुपे सह्याद्रीच्या कुशीतलं एक गाव आहे. इथल्या आदिवासी पाड्यांमध्ये विकास आणि पर्यटनाची हवा अजूनही पोहोचलेली नव्हती. गावाचं गावपण शाबूत होतं. गावात शंकररावांच्या खळ्यातच आम्ही आमचं बस्तान बांधलं.  सरांच्या मार्गदर